Monday, June 22, 2020

आई.

आई. 

I made this poem few years back , writing this today on this special occasion of my mother's 60th birthday.
आई ही कविता तुझ्यासाठी खास ,


तुझ्या सावली च्या पंखाखाली,
भरारी घेण्याची ताकद आम्हाला मिळाली ,
तुझ्या मातृत्त्वाच्या ऊषाखाली ,
गोड़  स्वप्नांची झेप आम्हाला मिळाली . 

तुझ्याशिवाय आमच जगणं काय ,
आमच अस्तित्व  नाही ,
आई तूच आमची प्रेरणा ,
तुझ्याविना काहीच नाही . 

जेव्हा लागत होते ऊन ,
तू दिलस आम्हाला सावली ,
कसे फेडू तुझे ऋण ,
तूच माझी माउली . 

अशीच राहा आमच्या पाठीशी ,
जर धडपड लो  तर उचलायला 
खंबीर राहा आयुष्यभर 
चुकलो तर शिकवायला 

आजवर काही ना मागता 
खूप काही दिलंस आम्हाला 
आम्ही मात्र कधीच 
समजू शकलो नाही तुला 

आज मिळाली सुवर्ण संधी 
मानते तुझे अंनत आभार 
आई विसरू शकत नाही कधी 
थोर तुझे ते उपकार !

No comments:

Post a Comment